कोल्हापूरात पंचगंगा नदीला पुन्हा एकदा प्रदूषणाचा विळखा बसला आहे. यामुळे कधी न पाहिलेलं पंचगंगा नदीचे रूप कोल्हापुरकरांना पाहायला मिळत आहे. नदीत फेसाळलेल्या पाण्याचा थर पाहून कोल्हापूरमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पंचगंगेच्या प्रदूषणामुळे नदी काठच्या गावांमध्ये आरोग्याच्या समस्या भेडसावत असून हा प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे.
आरोग्याचा प्रश्न उपस्थितीत
प्रदूषणामुळे संपूर्ण नदीचं पात्र फेसाने व्यापल्याचे दिसून येत आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पात्राला पुन्हा एकदा प्रदूषणाने विळखा घातल्याने आरोग्यासह या नदीचं पाणी फेसाळल्या सारखे का झाले आहे, असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर या समस्येची चौकशी व्हावी, अशी मागणी कोल्हापूरकरांकडून होत आहे.
(हेही वाचा – मोबाईलवर बोलणं आता पडणार महागात! वाचा, नवा केंद्रीय मोटार वाहन कायदा)
अद्याप पंचगंगा प्रदूषणमुक्त नाही
पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून असून अद्याप पंचगंगा प्रदूषणमुक्त झालेली नाही. महापालिकेकडून वेळोवेळी कारवाई करण्यात आली असून अजूनही हे प्रदूषण नाहिसे झालेले नाही. शहरातील काही काळ्या पाण्याचे ओढे या नदीत थेट मिसळले जात असल्याने हे रूप पंचगंगेचे निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस झाल्याने नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढली आणि नदीचे पाणी फेसाळलेले असून बर्फासारखे दिसत आहे.