हिंद केसरी स्पर्धेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. हिंद केसरी कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अस्थाई समितीने महाराष्ट्रातील मल्लांना इशारा दिला आहे. हिंद केसरी खेळणाऱ्या पैलवानांवर कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात समितीने एक पत्र देखील जाहीर केले आहे.
(हेही वाचा – विकेंडला फिरायला जाताय? ‘या’ किल्ल्यावर 30 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत पर्यटकांना बंदी)
हिंद केसरी खेळणाऱ्या पैलवानांवर कारवाई करणार असे पत्र महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष संजय कुमार सिंह यांनी जाहीर केले आहे.
असे आहे पत्र
भारतीय शैली कुस्ती महासंघाने दिनांक ५ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा -२०२३ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये जर महाराष्ट्रातील कोणतेही पैलवान खेळले किंवा पंच तसेच पदाधिकारी यामध्ये सहभागी असतील तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची अस्थाई समिती कारवाई करणार असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय शैली कुस्ती महासंघ व भारतीय कुस्ती संघ, हे दोन वेगवेगळे देशस्तरीय कुस्ती संघ आहेत. हिंदकेसरी हे टायटल वापरण्याचा अधिकार भारतीय शैली कुस्ती महासंघाला आहे, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.