महाराष्ट्रातील दर्जेदार आंबे आता अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्येही पाठवण्यात आले आहेत. कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यामुळे, भारताने आंब्याची निर्यात यावर्षी पुन्हा सुरु केली आहे. अमेरिकेच्या वाॅशिंग्टन येथील आंबा विक्री प्रदर्शनात विविध प्रकारचे आंबे असलेली पेटी अध्यक्ष जो बायडन यांना पाठवण्यात आली आहे.
आंबा पोहोचला व्हाईट हाऊसमध्ये
महाराष्ट्रातील दर्जेदार आंबा व्हाईट हाऊसमध्ये पोहोचला ही आनंदाची बाब आहे. रेनबो इंटरनॅशनल ही पुण्याची आंबा निर्यातदार कंपनी अमेरिकेत पाच प्रकारचे आंबे निर्यात करते. यामध्ये महाराष्ट्रातील केसर, हापूस, गोवा मानकूर, आंध्र प्रदेशातील हिमायत आणि बांगनपाली यांचा समावेश आहे. रेनबो इंटरनॅशलचे संचालक ए.एस.सी भोसले यांनी सांगितले. सोमवारी हा आंबा अमेरिकेला पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
( हेही वाचा: केतकी चितळेला अॅट्रोसिटी अंतर्गत अटक; न्यायालयाने 5 दिवसांची सुनावली कोठडी )
सुप्रिया सुळेंकडून रेनबोचे कौतुक
महाराष्ट्रातील दर्जेदार आंबे सातासमुद्रापार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले ही अतिशय आनंदाची बाब आहे. याबद्दल रेनबो इंटरनॅशनल यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा, असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Communityमहाराष्ट्रातील दर्जेदार आंबे सातामुद्रापार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले ही अतिशय आनंदाची बाब आहे. याबद्दल रेनबो इंटरनॅशनल यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी त्यांना खुप खुप शुभेच्छा.
— Supriya Sule (@supriya_sule) May 19, 2022