स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आणि स्थानिक सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रभक्ती समिती यांच्याद्वारे भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रुप कॅप्टन निलेश देखणे उपस्थित होते. ग्रुप कॅप्टन निलेश देखणे यांच्याहस्ते सकाळी ९ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरात संचलन केले.
( हेही वाचा : ७५ व्या स्वातंत्र्यदिनी मंत्रालयात ध्वजारोहण; महाराष्ट्राला देशातील अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने वाटचाल )
या संचलनाचे नेतृत्व संदेश गपट, राजेंद्र तिवारी, दिपक राठोड यांनी केले. महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिवाजी उद्यान परिसरात संचलन करण्याचे हे दुसरे वर्ष आहे. या संचलनात विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते, यासाठी विद्यार्थी जवळपास २० दिवसआधी तयारी करत होत. मुलांनी अपेक्षेप्रमाणे प्रात्यक्षिके सादर केली अशी माहिती संदेश गपट यांनी दिली.
Join Our WhatsApp Community