युवकाची हत्या; मृतदेहाशेजारी लिंबू, तांब्या फुलं आढळून आल्याने खळबळ

नांदेडच्या हिमायतनगरमधील वाशीच्या जंगलात एका युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. मृतदेहाशेजारी लिंबू, तांब्या, फुले आढळल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा नातेवाईकांचा संशय आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पांडूरंग लक्ष्मण तोटेवाड असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

हिमायतनगर शहरातील पांडुरंग लक्ष्मण तोटेवाड या युवकाचा तेलंगणा बाॅर्डवरील वाशीच्या जंगलात छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, मारेक-यांनी दगडाने ठेचून चेहार छिन्नविच्छिन्न अवस्थेत असेलला आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, दिलेल्या तक्रारीनुसार हिमायतनगर पोलिसांनी एका महिलेसह तीन पुरुष अशा 4 आरोपींविरुद्ध कलम 302,34 भादंवि अनुसार हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

( हेही वाचा: “अगले बरस आना है आना ही होगा…” २२ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला निरोप )

खून करुन अपघात भासवण्याचा प्रयत्न 

हिमायतनगर शहरातील युवक पाडुंरंग लक्ष्मण तोटेवाड याचा मृतदेह हिमायतनगर- तालुक्यातील तेलंगणा बाॅर्डरवर असलेल्या वाशीच्या जंगलात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. मयत युवक हा आपल्या घराशेजारी बसलेला असताना, आरोपींनी त्याला बोलावून वाशीच्या जंगल भागात नेऊन इतर साथीदाराच्या मदतीने दगडाने ठेचून खून केला. दरम्यान, सदर खून अपघात असल्याचे भासवण्यासाठी त्याचा चेहरा विद्रुप केला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here