Nashik bus Fire: प्रवासी साखरझोपेत असतानाच काळाचा घाला; 11 प्रवाशांचा मृत्यू, काय घडलं?

130

नाशिक -औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटे डंपर- खासगी बसच्या अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 11 प्रवाशांचा मृत्यू झाला. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील हाॅटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर ही भीषण घटना घडली. मिरची हाॅटेल परिसरात चिंताणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने बस काही क्षणात जळून खाक झाली. आग एवढी भीषण होती की काही वेळात आगीत झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. चिंतामणी ट्रॅव्हलची ही बस यवतमाळ येथून मुंबईकडे निघाली होती. दरम्यान, नाशिकहून ही बस मुंबईकडे मार्गस्थ झाली असताना पहाटे साडे चार ते पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.

( हेही वाचा: Nashik bus Fire:नाशिक बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे )

 

साखरझोपेत असताना काळाचा घाला

नाशिक सिटी लिंक बस सेवेच्या माध्यमातून जखमींना सिव्हल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरु झाले आहेत. प्रवासी गाढ झोपेत असताना अचानक आवाज झाला आणि सर्व प्रवासी जागे झाले, मात्र बसच्या अनेक भागात आग पसरली होती. अनेकांनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटलेली नाही. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.