खंडवानींचे नवाब मलिकांशी आर्थिक संबंध?

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित २९ ठिकाणी एनआयएकडून छापेमारी करण्यात आली. यात माहीम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांना ताब्यात घेतले. आता खंडवानी आणि मंत्री नवाब मलिक यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे नवाब मलिक यांच्यावर त्यांनी दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याकडून जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. दौड गॅंगशी संबंध असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. आता खंडवानी यांच्यासोबत मलिक यांचे आर्थिक संबंध समोर आल्यामुळे मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.|

(हेही वाचा आरडीएक्ससह पकडलेले चार दहशतवादी नांदेडमध्ये मुक्कामी होते! )

मुंबईतील चार ठिकाणी मारले छापे 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मुंबईतील 29 ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने छापे मारले आहेत. मुंबईतील नागपाडा, भेंडीबाजार, सांताक्रुझ, गोरेगाव, बोरीवली आणि मुंब्रा परिसरात सकाळपासून ही छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. डी कंपनीशी संबंधित ड्रग्ज पेडलर्स, हवाला ऑपरेटर्स आणि शार्प शूटर्सच्या मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आले. एनआयएने फेब्रुवारीत दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एनआयएकडून सातत्याने दाऊदशी संबंधित मालमत्तांवर कारवाई सुरु आहे. आजची कारवाईही त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. कारवाईतून आता एनआयएच्या हाती काय लागणार? याकडे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here