मी कोण आहे माहिती आहे का? म्हणत.. PMPML बसच्या ड्रायव्हरला तरुणाकडून मारहाण

पिंपरी- चिंचवडमध्ये PMPML तरुणांची दादागिरी काही संपायचे नाव घेताना दिसत नाही. पुण्यातील एका तरुणाने चक्क पीएमपीएमएलच्या चालकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये हा प्रकार घडला आहे. बसला एक दुचाकी आडवी येत होती ती काढायला लावली या कारणावरुन त्याने शिवीगाळ केली आणि बेदम मारहाण केली आहे.

( हेही वाचा: दिवसभर फिरा केवळ 40 रुपयांत; पुणेकरांची लाईफलाईन PMPML ची योजना )

अन् चालकाला केली मारहाण

पिंपरी चिंचवडमधील नेहरुनगर परिसरातील संतोषी माता चौकामध्ये भर दिवसा हा प्रकार घडला आहे. पीएमपीएमएल बसचे संचलन सुरु होते. यावेळी रस्त्यात संतोषी माता चौकात एक दुचाकी आडवी येत होती. त्यावेळी चालकाने तरुणाला गाडी बाजूला करण्यासाठी सांगितले होते. मात्र याचा तरुणाला राग आला आणि तुला माहित आहे का, मी कोण आहे? असे म्हटले. यावरुन दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर मुलाने थेट बसमध्ये प्रवेश केला आणि चालकाला मारहाण केली. ऋषीकेश घोडेकर असे या तरुणाचे नाव आहे.

तरुणाईची दादागिरी

पिंपरी चिंचवडमध्ये तरुणांना दादागिरी केल्याच्या घटना वाढल्या आहेत. PMPML च्या कंडकक्टरला लुटल्याचा प्रकार देखील काही दिवसांपूर्वी घडला होता. पिंपरी- चिंचवडमधील कासारवाजी येथील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस कंडक्टरकडून 3 हजार 355 रुपये लुटल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here