पोलीस निरीक्षकाच्या बढतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बढतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यभरातील १७५ पोलीस निरीक्षक यांना बढती देण्यात येणार असून या अधिकाऱ्यांच्या नावाची यादी महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयातून काढण्यात आली आहे. लवकरच या अधिकाऱ्यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात येणार आहे.
राज्य पोलीस दलातील पोलीस निरीक्षक यांची पदोन्नती कोरोना काळात रखडली होती. मुंबईसह इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहायक पोलिस आयुक्तपद रिक्त झाले होते. हे पदे भरण्यासाठी राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पोलीस निरीक्षकांची प्रत्येक जिल्ह्यातून यादी मागविण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community