Maharashtra Policeदलाचा ध्वज फडकला माउंट एव्हरेस्टवर

238
Maharashtra Policeदलाचा ध्वज फडकला माउंट एव्हरेस्टवर
Maharashtra Policeदलाचा ध्वज फडकला माउंट एव्हरेस्टवर

माउंट एव्हरेस्टचं शिखर सर करणं हे आजदेखील एक मोठं आव्हान आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस निरीक्षक द्वारका विश्वनाथ डोखे यांनी जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करून महाराष्ट्राचे नाव मोठं केलं तसेच एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी ठरल्या आहेत.

पोलीस निरीक्षक द्वारका विश्वनाथ डोखे यांनी २०२२ मध्ये माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला होता. पण हायर अल्टीट्युड पल्मनरी एडेमाचा त्रास झाल्यानं त्यांना परत फिरावं लागलं होतं. पण ‘कोशीश करने वालोंकी हार नही होती’ या पक्तींना प्रत्यक्षात आणण्याचा निश्चय करून दीड वर्ष त्यांनी स्वत:वर प्रचंड परिश्रम घेतले. 2024 मध्ये पुन्हा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा निश्चय केला. दोन महिन्यांच्या प्रवासानंतर २२ मे २०२४ रोजी त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं.

(हेही वाचा – Jitendra Awhad : स्टंटबाजीच्या नादात जीतेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेबांचा फोटो; अमोल मिटकरींचा आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.