पुण्यातील भवानी पेठ सोसायटीमध्ये तिस-या मजल्यावर स्फोट झाला. वाॅशिंग मशीन दुरुस्त करत असताना, हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पुण्याच्या भवानी पेठेत रविवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. रशाद मोहम्मद अली शेख असे या व्यक्तीचे नाव आहे.
मूळचा मुंबईचा इलेक्ट्राॅनिक इंजिनिअर असलेला रशात गेले अनेक महिने या फ्लॅटमध्ये राहत होता. त्याचा वाॅशिंग मशीन,ओव्हन रिपेअरिंगचा व्यवसाय असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. ही दुरुस्ती सुरु असतानाच, स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
( हेही वाचा: अभिनेता शक्ती कपूर यांचा मुलगा बंगळुरु पोलिसांच्या ताब्यात! )
अधिक तपास सुरु
पोलिसांनी रविवारी रशाद शेखच्या फ्लॅटमधून काही सिम कार्डस आणि पासपोर्टही जप्त केले. रविवारी संध्याकाळी भवानी पेठेतल्या विशाल सोसायटीत स्फोट झाला होता. या स्फोटचा आवाज इतका मोठा होता की, सोसायटीतल्या अनेक फ्लॅट्सच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. या स्फोटानंतर, बाॅम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस अजूनही तपास करत आहेत.
Join Our WhatsApp Community