स्टेअरिंग हाती घेत, ‘त्या’ रणरागिनीने असे वाचवले प्रवाशांचे प्राण!

स्त्री ही कोणत्याही प्रसंगात खंबीरपणे उभी असते. संसार सांभाळून तिने अनेक क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. महिलांच्या ड्रायव्हिंग स्किलची थट्टा करणारे अनेक विनोद सर्वांनाच माहिती आहेत. पण, वेळ आली तर स्त्री कशी तारु शकते याचा प्रत्यय नुकताच आला. पुण्यात एका बस चालकाला अचानक फीट आली. त्यावेळी प्रसंगावधान दाखवत त्या बसमधून प्रवास करणा-या महिलेने बसचे स्टेअरिंग आपल्या हाती घेतले आणि आलेल्या संकटाला सामोरी गेली. आता या महिलेवर सर्व स्तरावरुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आणि ठरल्या तारणहार

पुण्यात एक बस महिला पर्यटकांना घेऊन जात असताना, अचानक बस चालकाना फीट आली, त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सूटले. त्यावेळी त्या बसचा होणारा भीषण अपघात टाळत, बसमधील प्रवासी योगिता सातव यांनी बसचं स्टेअरिंग आपल्या हाती घेतलं आणि आपल्यासोबत इतर प्रवाशांचेही प्राण वाचवले. शिवाय त्यांनी बस चालकाला रुग्णालयात दाखल केले आणि बस चालकाचाही जीव वाचवला. या महिलेचा बस चालवतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

( हेही वाचा :खऱ्या गड-किल्ल्यांवर अतिक्रमण अन् मंत्र्याच्या बंगल्यांना गड-किल्ल्यांच्या नावांचा देखावा! )

नेमक काय घडलं

महिलांचा एक ग्रुप पर्यटन करत असताना, त्यांच्या 40 वर्षीय बस चालकाला अचानक फीट आली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. अशा वेळी बसमधून प्रवास करत असलेल्या योगिता सातव यांनी प्रसंगावधान राखत बसचे स्टेअरिंग हाती घेतले आणि अनियंत्रित होऊ शकणाऱ्या बसवर ताबा मिळवला आणि चालकाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. जवळपास 10 किलोमीटर पर्यंतचा प्रवास त्यांनी केला. वाघोली येथील योगिता सातव यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे चालकासह प्रवासी महिलांचेही प्राण वाचले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here