अमरावतीमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी; काही भागांत कलम 144 लागू

123

अमरावतीमध्ये रविवारी रात्री ध्वजारोहणावरून दोन गटात हाणामारी झाली, त्यानंतर अमरावतीच्या काही भागात पोलिसांनी कलम 144 लागू केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अचलपूरमध्ये रविवारी रात्री दोन गटात ध्वजावरून वाद झाला. या प्रकरणी 3 एफआयआर नोंदवण्यात आल्या असून 16 जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांचे आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या परिस्थिती शांततापूर्ण असून अचलपूर आणि परतवाडामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सध्या या घटनेच्या तपास सुरु आहे.

( हेही वाचा :आता कारवाईचा वाजणार भोंगा! परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई )

आधीही हाणामारी झाली होती

काही दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराच्या  कथेवरील ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून दोन गटात वाद झाला होता. येथील अचलपूर परिसरात चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटगृहातून बाहेर आलेल्या काही तरुणांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या, त्यानंतर तेथे उपस्थित काही लोक संतप्त झाले आणि हाणामारीला सुरुवात झाली. त्यानंतर पोलिसांनी 15 जणांना अटक केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.