विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय परिसरात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या लातूर शाखेच्या वतीने २६ ऑगस्टला द्वारसभा घेण्यात आली. २४ ऑगस्टला सोलापूर येथील परिचारीका महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थींनी अधिष्ठाता कार्यालयासमोर सकाळी सुमारे ११ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ मनिषा शिंदे यांच्या विरोधात धरणे आंदोलन केले होते. हे आंदोलन विद्यार्थ्यांनी अधिष्ठातांना दिलेल्या तक्रारीचा अनुषंगाने होते. यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली असून, या समिती मार्फत दोन्ही बाजूंची चौकशी करण्यात येत आहे त्याचा अहवाल प्राप्त होणे अजून बाकी आहे. या आंदोलनाला विविध संस्था व बाह्य संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. यामुळे या प्रशासकीय बाबीला राजकीय स्वरूप प्राप्त होत आहे असा परिचारिका संघटनेचा दावा आहे.
( हेही वाचा : सोलापूरात शासकीय परिचारीका प्रशिक्षण महाविद्यालयात सुरू असलेल्या बेकायदेशीर आंदोलनाचा निषेध)
दरम्यान, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, शाखा सर ज. जी. समुह रुग्णालये, मुंबईत सुद्धा सोलापूर प्रकारामध्ये डॉ. मनिषा शिंदे यांच्या समर्थनार्थ व सदर प्रकरणाच्या निषेधार्थ द्वारसभा घेण्यात आली.
अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल
कोणतीही शासकिय परवानगी न घेता होत असलेले आंदोलन आणि ज्या आक्षेपार्ह भाषेचा वापर करून प्रशिक्षणार्थींनी वैद्यकिय महाविद्यालय व परिचारीका प्रशिक्षण महाविद्यालयातील अध्यापन क्षेत्राशी निगडीत सर्व शिक्षकांचा अवमान केला, अशा आंदोलन कर्त्यांची चौकशी व्हावी आणि योग्य कार्यवाही करण्यात यावी तसेच डॉ मनीषा शिंदे यांची होत असलेली मानहानी तात्काळ थांबवावी अन्यथा या गोष्टीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने, राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल. यामुळे रुग्णसेवा विस्कळीत झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील. याबाबतचे निवेदन शासन व प्रशासनास संघटनेच्या वतीने दिले आहे असा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे.
Join Our WhatsApp Community