सरकारी रुग्णालयांत रुग्णसेवा खोळंबणार; परिचारिका संघटनेचा बेमुदत संपाचा इशारा

सोलापूर येथील परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा मनिषा शिंदे यांची बदली करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाने केले आहे. ही बदली नियबाह्य असल्याचा आरोप करत शुक्रवारी राज्यभरातील बहुतांश सरकारी रुग्णालयात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आता बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. ३० नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात बेमुदत आंदोलन सुरु केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे.

( हेही वाचा : Sunday Megablock : रविवारी प्रवाशांची होणार गैरसोय; पहा मेगाब्लॉकचे संपूर्ण वेळापत्रक!)

शुक्रवारी राज्यातील काही सरकारी रुग्णालयांत परिचारिकांनी काही तास बदलीविरोधात घोषणाबाजी केली. परिचारिका संघटनेच्या तक्रारीनुसार, पुण्यातील ससून रुग्णालय तसेच सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात अधिसेविकांविरोधात आम्ही वारंवार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला देत आहोत. मात्र त्याबाबत गंभीरतेने दखल घेतली जात नाही. संघटनेच्या अधिका-यांना सरकारी अधिका-यांकडून त्रास दिला जातो. सोलापूर येथील सरकारी रुग्णलयातील अधिसेविकांवर मनुष्यवधाचा आरोप आहे. या अधिसेविकेने परिचारिका संघनेच्या माजी अध्यक्षा आरीफा शेख यांची खोटी तक्रार केली. त्यांची बदली केल्यानंतर बेकायदेशीर निलंबनही करण्यात आले होते, असाही आरोप महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने केला आहे. आता संघटनेच्या अध्यक्षा मनिषा शिंदे यांची बदली होत असल्याबाबत संघटनेचा आक्षेप आहे. बदली रद्द व्हावी म्हणून २८ नोव्हेंबरपर्यंत सर्व सरकारी रुग्णालयात काळ्या फिती लावून काम केले जाईल. २९ नोव्हेंबर रोजी काम बंद आंदोलन केले जाईल, अधिका-यांनी बदली रद्द केली नाही तर ३० नोव्हेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन केले जाईल.

शुक्रवारच्या परिचारिकांच्या आंदोलनाची पूर्वकल्पना आम्हांला संघटनेकडून दिलेली नाही.याबाबत अधिक माहिती देऊन भाष्य केले जाईल.
दिलीप म्हैसेकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालय

आम्ही आंदोलनाची पूर्वकल्पना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाला दिली आहे. बदलीचे आदेश त्यांनी दिलेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालय खोटे बोलत आहेत.
मनिषा शिंदे, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here