क्रांतिसिंह नाना पाटील आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान व योगदान देणारे, समाजासाठी आयुष्य वेचणारे महाराष्ट्रातील काही समाजसेवक आणि क्रांतिकारकांची शौर्यगाथा प्रतासत्ताक दिनी दिल्लीच्या ‘जनपथ’ वर झळकणार आहे. हा इतिहास चितारण्याचा मान महाराष्ट्रातील पाच चित्रकारांना मिळाला असून, त्यात सांगलीच्या ‘कलाविश्व’ च्या चौघांचा समावेश आहे.
चित्रांच्या माध्यमातून मानवंदना
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, दिल्लीतर्फे चित्कारा युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने २५ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान देशभरातील ३०० नामांकित चित्रकरांना घेऊन कलाकुंभ नावाचा राष्ट्रीय आर्टिस्ट कॅम्प आयोजित केला होता. त्याची संकल्पनाच ‘देशसेवेत योगदान देणारे दुर्लक्षित नॅशनल हिरो’ अशी होती. आपापल्या राज्यातील अशा समाजसेवक, क्रांतिकारक, देशभक्तांनी दिलेले योगदान, त्यांचे कर्तृत्व चित्रांच्या माध्यमातून या चित्रकारांना साकारायचं होतं. देशभरातून आलेल्या या नामांकित चित्रकारांनी आपापल्या राज्यातील अशा महान व्यक्तींचा प्रवास कॅनव्हासवर साकारला.
( हेही वाचा: १२ आमदारांच्या निलंबनावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडसावले! म्हणाले…)
नाना पाटील यांची शौर्यगाथा
अन्यायासमोर आम्ही नमणार नाही, पाशवी व जुलमी सत्तेला प्रणाम करणार नाही, ती जुलमी सत्ता मला चिरडेल. चिरडो! मी माझे आत्मीक स्वातंत्र्य राखून ठेवेन. हेच एक खरे स्वातंत्र्य. आम्ही निःशस्त्र असू, पण सत्तेचे वटहुकूम मुकाट्याने आम्ही मानणार नाही,’ असे ठणकावून सांगणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांची शौर्यगाथा प्रजासत्ताक दिनी जनपथवर झळकणार आहे.
Join Our WhatsApp Community