बॉलिवूड पार्कमध्ये रंगली अ‍ॅक्शन! महाराष्ट्र पर्यटनाने दिले फिल्मी मदर्स डे गिफ्ट

मदर्स डे निमित्त महाराष्ट्र पर्यटन विभागाने सर्व मॉम ब्लॉगर्ससाठी एक बॉलिवूड स्टाईल हटके सेलिब्रेशन प्लॅन केलं होतं. फिल्मसिटी गोरेगाव येथे वसलेल्या बॉलिवूड थीम पार्कची सफर असं सेलिब्रेशनचं स्वरूप होतं. 5 मे, 2022 रोजी पार पडलेल्या या सहलीत ब्लॉगर्स मीट इन्फो ग्रुपमधील 20 ब्लॉगर्स मॉमची निवड करण्यात आली होती.

( हेही वाचा : येत्या रविवारी होणार प्रवाशांचा खोळंबा! या मार्गांवर असणार मेगाब्लॉक )

मज्जा मस्तीने भरलेल्या या पूर्ण दिवसात मॉम्ससाठी खास लंचचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना पार्कमध्ये 7D थिएटरचा अनुभव घेता आला. या 20 जणींपैकी बहुतेकींनी पहिल्यांदाच 7D अनुभव घेतला व ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाचे आभार मानले. या सहलीचं आणखीन एक आकर्षण ठरलं ते म्हणजे क्रोमा थिएटरची सफर, VFX सिनेमात क्रोमा वर फुटेज कसे शूट केले जाते, कसे संपादित केले जाते तसेच फॉली साउंडचे हॅक याविषयी माहिती देण्यात आली. व्हिंटेज बॉलीवूड स्टाईल थिएटरमध्ये भारतीय चित्रपटांच्या इतिहासाची झलक दाखवण्यात आली. या पार्कमध्ये विविध हिट सिनेमांचे सेट साकारण्यात आले आहेत, येथील डमी बॉलीवूड कलाकार फेमस बॉलिवूड पात्रांचे रूप घेऊन आलेल्या पाहुण्यांचे मनोरंजन करतात.

मॉम इन्फ्लूएंसर श्रेया गौतम यांनी या अनुभवाविषयी माहिती देत, महाराष्ट्र पर्यटनासह बॉलीवूड पार्कची सफर खरोखरच एक अनोखा आणि भन्नाट अनुभव असल्याचे सांगितले. श्रेया म्हणतात, “मला सेटवर फिल्मी रील्स बनवताना, जोधा अकबर आणि मस्तानीचा पोशाख वापरण्यात, 7D अनुभव घेताना आणि चित्रपट बनवण्याच्या तंत्राची माहिती मिळवण्यात मला खरोखरच आनंद झाला. केक कटिंग मध्ये सुद्धा आयोजकांनी खास डायट केक आणणे हा उपक्रम किती विचारपूर्वक आयोजित केला होता याचे उदाहरण आहे.”

अविस्मरणीय अनुभव

सहभागी ब्लॉगर स्तुती यांनी या कार्यक्रमादरम्यान माझं बॉलीवूड प्रेम नव्याने जगता आले असे म्हणत पर्यटन विभागाचे आभार मानले. तुम्ही बॉलिवूड फॅन असाल किंवा नसाल पण सिनेमा पाहिलेल्या किंवा पाहणाऱ्या प्रत्येकाने या बॉलिवूड पार्कला भेट द्यावीच, भव्य दिव्य, अत्यंत सुंदर सेट व येथील बॉलिवूड थीम सादरीकरणे तुम्हाला अविस्मरणीय अनुभव देतील असे सहभागी झालेल्या सर्व मॉम ब्लॉगर्सनी आवर्जून सांगितले.

तर मंडळी, मदर्स डे जवळ आला आहे, लवकरच बॉलीवूड पार्क मध्ये भन्नाट लाँच पार्टीचं सुद्धा प्लॅनिंग सुरु आहे, त्यामुळे यंदा आईला हटके गिफ्ट देण्याचा विचार असेल तर वीकेंडचा योग साधून ही ट्रिप करण्याचा नक्की विचार करा.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here