आपण कोणत्याही अनोळखी ठिकाणी गेलो आणि आपल्याला जर रस्ता माहित नसेल तर आपण थेट गुगल मॅपचा आधार घेतो. मात्र तुमचं Google मॅप तुमची दिशाभूल तर करत नाही ना? कारण अलीकडेच गुगल मॅपच्या सहाय्याने कोकणात इच्छित स्थळी जात असताना अनेकांची वाट चुकल्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून यासंदर्भात लक्ष घालण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहेत.
(हेही वाचा – एक नोव्हेंबरपासून LPG गॅस सिलिंडरची डिलिव्हरी मिळणार नाही! काय आहे कारण?)
कोकणात महाराष्ट्रासह देश-विदेशातून पर्यटक येण्याची संख्या मोठी आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पर्यटक कोकणात येतात. परंतु कोकणातील सह्याद्रीच्या कडेकपारीतून जाणाऱ्या नागमोडी वळणाचे सर्वच रस्ते माहित असतील असे नाही. एखाद्या माहित नसलेल्या ठिकाणी किंवा किनाऱ्यावर कसे जायचे, कोणता मार्ग कोणत्या किनाऱ्यावर जातो हे कळतच नाही. त्यामुळे गुगल मॅपच्या मदतीने अनेक जण गुगल मॅपची मदत घेतात. मात्र अनेकदा त्यांची फसवणूक होत असल्याचे काही प्रकार सध्या महाडमध्ये सुरू असल्याचे समोर आले आहे. महाडमध्ये पर्यटकांनी रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅपची मदत घेतली मात्र त्यांचे गुगल मॅप योग्य काम करत नसल्याने महाडमध्ये पर्यटक रस्ता भरकल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांपासून गुगल मॅप भरकल्याने रत्नागिरी आणि दापोलीकडे जाण्याचा मार्ग महाड तालुक्यातील दासगाव हद्दीतून एका डोंगर भागातील वांद्रे कोंड या ठिकाणाहून दाखवत आहे. गुगल मॅपचा आधार घेऊन चालणारी वाहने थेट या मार्गावर जात आहेत. मात्र हा मार्ग अरूंद आणि खडतर असल्याने पुन्हा महामार्गावर परतताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेकडो वाहने या मार्गावर यामुळे जात आहेत. मात्र हा मार्ग रात्रीच्या वेळी धोकादायक असल्याने संबंधित प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याचे गरजेचे असल्याचे पर्यटकांकडून सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community