हिंदू धर्माच्या अनेक मोठ्या सणांपैकी एक म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्री (Mahashivratri) हा भगवान शिवाशी संबंधित सण आहे आणि देशभरात विविध पद्धतीने हा सण साजरा केला जातो. महाशिवरात्री हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, पण तुम्हाला माहित आहे का की ‘आपण महाशिवरात्री का साजरी करतो?’ आज आम्ही तुम्हाला हा पवित्र दिवसाची माहिती सांगणार आहोत. (Mahashivratri 2024)
या रात्रीचे विशेष महत्त्व आहे आणि याचा लाभ आपण अधिक चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. आपल्या भारतीय संस्कृतीत वर्षातील ३६५ दिवस सण साजरे करण्याची परंपरा आहे. मात्र महाशिवरात्री हा सण अतिशय वेगळी आहे. हिंदू धर्मानुसार दर महिन्याला मासिक शिवरात्री साजरी केली जाते, परंतु फाल्गुन महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला (Mahashivratri) विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह झाल्याचे मानले जाते. (Mahashivratri 2024)
हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) रात्री लाखो सूर्यांच्या प्रभावाने भगवान शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले. तेव्हापासून दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. विविध ग्रंथांमध्ये महाशिवरात्रीच्या कथा सांगितल्या गेल्या आहेत. सुरुवातीला भगवान शिवाचे केवळ निराकार रूप होते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मध्यरात्री भगवान शिव निराकारातून वास्तविक रूपात प्रकटले. (Mahashivratri 2024)
(हेही वाचा – Women Entrepreneurship : भारतात ६३ टक्के महिलांना उद्योजकतेची ओढ)
ही आहे शिवरात्री पारायणाची वेळ
महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) दिवशी भगवान शिव अग्निलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. काही हिंदू मान्यतेनुसार या दिवसापासून विश्वाची निर्मिती झाली. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव लाखो सूर्यांच्या बरोबरीने लिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. असे मानले जाते की या दिवशी प्रदोषाच्या वेळी भगवान शिव आपल्या रुद्र अवतारात येतात आणि तांडव करताना आपल्या तिसऱ्या डोळ्याने जगाचा नाश करतात. याचा अर्थ ते दुष्ट शक्तीचा नाश करतात. (Mahashivratri 2024)
भगवान शिव हे संहारक नसून ज्ञानी आहेत. योगिक परंपरेनुसार, शिव हे आदिगुरू आहेत ज्यांनी प्रथम ज्ञान प्राप्त केले आणि ते ज्ञानाचा प्रसार केला. हिंदू दिनदर्शिकेनुसार, चतुर्दशी तिथी ८ मार्च रोजी रात्री ९:५७ वाजता सुरू होते आणि ९ मार्च रोजी सायंकाळी ६:१७ वाजता संपते. निशित काळ ९ मार्च रोजी सकाळी २.०७ ते सकाळी १२.५६ असून शिवरात्री पारायण सकाळी ६.३७ ते सकाळी ०३.२९ अशी वेळ आहे. तर या पवित्र दिवशी भगवान शिवाची उपासना नक्कीच करा. (Mahashivratri 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community