मुंबईतील वीज टंचाई होणार दूर!

मुंबईला आवश्यक असणारी गरज दिवसेंदिवस वाढत असल्याने मुंबईकरांकडून वीजेची मागणी सातत्याने वाढती आहे. त्यात सध्या उद्योगपती गौतम अदानींच्या अदानी पॉवरकडे मुंबईच्या बहुतेक भागात वीज पुरवठा कऱण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वीजटंचाई कमी करण्यासाठी अदानी समूहाच्या खारघर-विक्रोळी वीज पुरवठा कंपनीला ४०० केव्हीच्या विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी वन खात्याच्या मालकीची ५७.५०९२ हेक्टर म्हणजेच १२८ एकर ७७ गुंठे वन जमीन देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबईची वीज टंचाई दूर होणाच्या शक्यता असून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

(हेही वाचा – दिल्ली, महाराष्ट्रात घातपाताचा कट? हरियाणातून चार संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात)

तसेच गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वीज पुरवठा करण्यात कित्येकदा व्यत्यय आल्याचे पाहायला मिळाले होते. यामुळे हा व्यत्यय दूर करण्यासाठी अदानी कंपनीने खासघर-विक्रोळी वीज पुरवठा कंपनी स्थापन केली आहे. त्या कंपनीद्वारे नवी मुंबईतील खारघरपासून मुंबईतील विक्रोळीपर्यंत १५०० मेगावॅट वीज वाहून नेण्यासाठी ४०० के.व्ही.च्या उच्चदाब वीजवाहिन्या टाकण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प

हा प्रकल्प मुंबई शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे मुंबईत अतिरिक्त वीज आणणे शक्य होऊन शहराची भविष्यातील मागणी पूर्ण करणे शक्य होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला डिसेंबर २०१९ मध्ये प्रकल्पासाठी एलओआय प्राप्त झाला होता. त्यानंतर आता त्यासाठी ही वन जमीन अदानींच्या खारघर-विक्रोळी वीज पुरवठा कंपनीकडे वळती करण्याचा निर्णय ८ फेब्रुवारी २०२२ रोजी घेतला आहे. केंद्र सरकारच्या वने आणि पर्यावरण मंत्रालयासह जलवायू मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून तसेच मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घेऊनच खारघर-विक्रोळी वीज पुरवठा कंपनीला या वीजवाहिन्या टाकाव्या लागणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here