राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपावर अखेर तोडगा निघाला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मध्य रात्रीपासून ७२ तासांचा संप पुकारला होता. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महावितरण अधिराऱ्यांची बैठक घेत मध्यस्थी केल्यावर अखेर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
( हेही वाचा : ‘अमृत भारत स्थानक’ योजना; मध्य रेल्वेच्या या १५ स्टेशनचे रुप बदलणार )
सरकारला वीज कंपन्यांचे खासगीकरण करायचे नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा विभागाचे अधिकारी, महावितरण, महानिर्मिती, महापारेषण विभागाचे अधिकारी आणि विविध वीज कर्मचारी संघटना यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यानंतर या संपावर तोडगा निघाला.
राज्य सरकारला वीज कंपन्यांचे खासगीकरण करायचे नाही येत्या ३ वर्षांमध्ये राज्य सरकार ५० हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. राज्य वीज नियामक आयोगाकडून आपल्या हिताचे निर्णय घेतले जातील अशी भूमिका सरकार घेईल असे फडणवीसांनी सांगितले. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबतही सरकार सकारात्मक असल्याचे ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community