मराठी चित्रपट विश्वातील दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर अडचणीत सापडल्याचे समोर आले आहे. महेश मांजरेकरांच्या वेडात मराठे वीर दौडले सातत या ऐतिहासिक चित्रपटावरून सुरू असलेला वाद अद्याप मिटलेला नसताना मांजरेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी न्यायालयाने पोलिसांना त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एका अपघातात एका आश्रमशाळेच्या संस्थाचालकाविरोधात अर्वाच्च वक्तव्य केल्याप्रकऱणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – दिल्ली पुन्हा हादरली! १२ वीच्या विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला, बघा CCTV फुटेज)
काय आहे प्रकरण?
पुणे-सोलापूर महामार्गावर महेश मांजरेकर यांच्या गाडीला अपघात झाला होता. ती गाडी एका आश्रमशाळेच्या संस्था चालकांची होती. मांजरेकरांवर संस्थालकांविरोधात बदनामी करणारे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. याबाबत टेंभुर्णी पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
टेंभुर्णीतील संत रोहिदास आश्रमशाळेचे संस्थापक कैलास सातपुते आणि महेश मांजरेकर या दोघांच्या वाहनांचा पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ अपघात झाला होता. गेल्या वर्षी 2021 साली हा अपघात झाला होता. त्यावेळी मांजरेकरांनी बदनामी करणारे वक्तव्य केल्याचा आरोप सातपुते यांनी केला होता. दरम्यान, मांजरेकर यांनी सातपुते यांच्याविषयी बदनामी करणारे वक्तव्य करून प्रतिमा मलिन केल्याची फिर्याद माढा न्यायालयात दिली होती. फिर्यादीची दखल घेत न्यायाधीश गांधींनी टेंभुर्णी पोलिसांना मांजरेकर यांच्याविरूद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत.
Join Our WhatsApp Community