मोठी दुर्घटना : नेरूळमध्ये इमारतीचे छत कोसळले

नवी मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. नेरूळमध्ये सेक्टर १७ जिमी पार्कमधील इमारक क्रमांत एकचा स्लॅप ६ व्या मजल्यापासून खाली कोसळला. शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. घरामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. पोलिसांचा ताफा या भागात दाखल झाला असून, परिसरातील इतर इमारतींमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे.

( हेही वाचा : कासवप्रेमी सुखावले, ‘या’ दुर्मिळ कासवाचे दर्शन)

मदतकार्य सुरू 

या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने आणि या परिसरातील रस्ता लहान असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. तरीही अग्निशमन दलाच्या जवानांना बहुतांश लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी नोंदवली आहे. परंतु ही इमारत किती वर्ष जुनी होती याबाबतचा आढावा घेण्यासाठी पालिका अधिकारी तसेच स्थानिक आमदार घटनास्थळी दाखल झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here