CBI ची मोठी कारवाई; पाच सरकारी अधिकाऱ्यांसह दोन खासगी व्यक्तींना अटक

156

केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने मुंबईच्या सीमाशुल्क विभागाच्या तत्कालीन सहा अधीक्षकांविरुद्ध सहा स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. शासकीय सेवकांनी त्यांच्या UB केंद्र, JNCH मध्ये पोस्टिंग दरम्यान वेगवेगळ्या वेळी खासगी व्यक्तीसोबत कट रचला आणि सीमाशुल्क कायद्यांतर्गत निवास हस्तांतरण च्या तरतुदीचा गैरवापर केला. या टोळीने दोन वर्षांहून अधिक काळ परदेशात राहणा-या विविध व्यक्तींच्या पासपोर्टचा वापर केल्याचा आरोप आहे.

आयात केलेला माल आदर्शपणे ज्या व्यक्तीचा पासपोर्ट सीमाशुल्कासमोर घोषित करण्यात आला होता. त्या व्यक्तीसाठी आयात केला जाणे अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात हा माल परदेशात स्थायिक झालेल्या आणि परदेशात राहणा-या इतर अनेक व्यक्तींसाठी आयात केला गेला होता. पासपोर्ट धारकास त्याचा पासपोर्ट वापरण्याची परवानगी देण्यासाठी 15 हजार रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. सीमाशुल्क अधिका-यांच्या संगनमताने ही पद्धत अवलंबली होती.

( हेही वाचा: केंद्रीय मंत्र्यांचा अपघात; भरधाव ट्रकने कारला उडवले )

मुंबई, दिल्ली, गाझियाबाद, जयपूर, मोतिहारी, कुरुक्षेत्र आणि रोहतक येथे आरोपी आणि त्यांच्या साथीदारांच्या आवारात 19 ठिकाणी झडती घेण्यात आली. त्यामध्ये विविध कागदपत्रे आणि साहित्य सीबीआयकडून जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींना अलिबाग, जिल्हा रायगड येथील विशेष न्यायाधीश, सीबीआय केसेस यांच्यासमोर हजर केले असता, त्यांनी आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.