ICICI बॅंकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केली आहे. कथित कर्ज फसवणूक प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे. दोन वर्षांपूर्वी ईडीने चंदा कोचर यांची 78 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. त्यानंतर आता सीबीआयने कोचर दाम्पत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
चंदा कोचर ज्यावेळी आयसीआयसीआयच्या सीईओ आणि एमडी होत्या. त्यावेळी आयसीआयसीआय बॅंकेने व्हिडीओकाॅन ग्रुपला 3 हजार 250 कोटींचे कर्ज दिल्याचा आरोप आहे. ईडीने या प्रकरणात 2019 साली कारवाई केली होती. त्यावेळी खटलादेखील दाखल केला होता. चंदा कोचर पदावर असताना त्यांनी व्हिडीओकाॅन समूहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत यांना कर्ज दिले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आणि नियम डावलून काम केल्याचा आरोप करण्यात आला होता.
( हेही वाचा: HALAL: हिंदू कोळ्यांकडून मुसलमान खरेदी करत नाहीत मासे )
दरम्यान, व्हिडीओकाॅन समूहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या व्यवसायात 64 कोटी रुपयांचे भांडवल गुंतवल्याचा आरोप आहे. 3 हजार 250 कोटींपैकी 2 हजार 810 कोटी रुपये बुडीत कर्ज म्हणून जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे ईडी आणि सीबीआयचा संशय बळावला गेला आणि CBI ने आता कारवाई केली आहे.
Join Our WhatsApp Community