अमेरिकेतील विमानसेवा कशामुळे झाली ठप्प? १२००हून अधिक विमानांवर झाला परिणाम

153

अमेरिकेतील अचानक विमानसेवा ठप्प झाल्याचे समोर आले आहे. यामुळे विमानतळांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. कॉम्प्युटर सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे संपूर्ण अमेरिकेतील विमानसेवा ठप्प झाली आहे. AFP या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या (Federal Aviation Administration) कॉम्प्युटरमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे अमेरिकेतील विमानसेवेवर परिणाम झाला आहे.

नेमकं काय झालं?

अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन सिस्टम पायलट आणि इतर क्रूला धोका आणि हवामान बदलाबाबत अपडेट करत असते. अमेरिका नागरिक उड्डाण नियामकच्या वेबसाईटनुसार, ही सिस्टम खराब झाली आहे. कोणत्याही माहितीची देवाणघेवाण होऊ शकत नाहीये. या कारणामुळे संपूर्ण अमेरिकेत विमान सेवा ठप्प झाली आहे.

स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी ५.३० वाजल्याच्या सुमारास अमेरिकेला येणारे आणि जाणारे १२०० हून अधिक विमानं रोखली. USFAAने सांगितले की, “एजेंसी टू एअर मिशन सिस्टममध्ये सुधार करण्याचं काम करत आहे.” FAAने निवेदनात म्हटले की, “आम्ही शेवटच्या टप्प्यातली तपासणी करत आहोत आणि सिस्टम रिलोड करत आहोत. त्यामुळे नॅशनल एअरस्पेस सिस्टम प्रभावित झाली आहे.”

(हेही वाचा – भ्रष्टाचार करताना धर्म आठवला नाही का? नितेश राणेंचा मुश्रीफांवर हल्लाबोल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.