यंदाची मकरसंक्रात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी खास होती, कारण त्यांनी घरच्यांना न कळवता थेट घरातल्या स्वयंपाक गृहात प्रवेश केला आणि तिळाचे लाडू बनवण्याची पाककृती सुरु केली. तिळाचे लाडू बनवून त्याने तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरलही केला.
तिळगुळ बनवण्याचा माझा पहिला प्रयत्न! 😀#MakarSankranti pic.twitter.com/NpmebFH6pA
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 15, 2023
तिळाचे लाडू बनवण्याची रेसिपी सांगितली
मकरसंक्रांतीला तिळाच्या लाडूला विशेष महत्त्व आहे. या सणाच्या आधीपासूनच घराघरांत तिळगुळ बनविले जातात. आणि हे तिळगुळ प्रत्येकाला वाटून ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ अशा शुभेच्छा दिल्या जातात. हा सण साजरा करताना आपले सेलिब्रिटीही कुठे मागे नाहीत. नुकताच मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकरने आपल्या घरी स्वत:च्या हाताने तिळगुळ बनविले आहेत आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. सण म्हटला की त्यात आनंद, उत्साह, जल्लोष आणि प्रेमाचा गोडवा येतो. हा आनंद साजरा करताना सामान्य नागरिकांसह सेलिब्रिटीही तितकेच उत्साही असतात. असाच एक व्हिडिओ क्रिकेटर सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो स्वत: आपल्या हाताने तिळगुळ बनवताना दिसतो. तसेच, तिळगुळ बनवताना तो तिळगुळ कसा बनवायचा याची रेसिपीही अत्यंत रंजक पद्धतीने सांगतोय. या व्हिडिओच्या शेवटी त्याने सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. या व्हिडीओमध्ये तिळगुळाचे लाडू बनवताना सचिन तेंडुलकरने ते कशा पद्धतीने बनविले जातात याची रेसिपीही सांगितली आहे.
(हेही वाचा ‘वन-डे’मध्ये विराटच बेस्ट; विश्वविक्रमापासून तीन शतके दूर)
Join Our WhatsApp Community