दुर्मिळ पक्षी म्हणून गणला जाणारा ‘माळढोक’ आता दिसणंही दुर्मिळ!

254

दुर्मिळ पक्षी म्हणून गणला जाणारा ‘माळढोक’ आता दिसणेही दुर्मिळ झाले आहे. मागील पाच वर्षे कुठेतरी एक दिसल्याची नोंद झालेला माळढोक यंदा दिसलाच नाही. त्यामुळे माळढोक नावाने ओळखल्या जाणाऱ्या नान्नज अभयारण्यातील माळढोक नामशेष होतो की काय ? शिवाय महाराष्ट्रातून गायब झाल्याचे चित्र दिसत आहे.

(हेही वाचा – दोन दिवस पडणार ताऱ्यांचा पाऊस, दर तासाला पडणार १००० उल्कापिंड! )

साधारण १९७९ मध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज परिसरात माळढोक पक्षी दिसला. त्यानंतर राज्यातील पहिले माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज येथे १९८५ मध्ये घोषित झाले. देशात कच्च (गुजरात), राजस्थान व नान्नज (उत्तर सोलापूर) येथे माळढोक पक्षी अभयारण्ये आहेत. माळढोक पक्षी हा दुर्मिळ पक्षी म्हणून ओळखला जातो. नान्नज अभयारण्यातील माळढोक पक्ष्याची संख्या २००८ साली ३० पर्यंत पोहोचली होती.

माळढोक नामशेष झाला की काय?

नान्नज, कारंबा, अकोलेकाटी, मार्डी, वडाळा परिसरात पसरलेल्या विस्तीर्ण क्षेत्रात सगळीकडे माळढोक पक्षाचा वावर होता. हाच पक्षी कधी-कधी रेहेकुरी (करमाळा), गंगेवाडी (दक्षिण सोलापूर) या गावातील अभयारण्यातही दिसू लागला. त्यामुळे माळढोक पक्षी अभयारण्याची व्याप्ती वाढली. मात्र स्थलांतरित होणारा माळढोक पक्षी हळूहळू दिसणेही दुर्मिळ झाले.  मागील चार वर्षे माळढोक सर्वसामान्य पर्यटकांना दिसलाच नव्हता. मात्र वन्यजीव विभागाच्या दप्तरी २०१७ पासून दरवर्षी एक माळढोक दिसल्याची नोंद झाली आहे. यावर्षीच्या पक्षी गणनेत एकही माळढोक आढळला नाही. म्हणजे माळढोक नामशेष झाला की काय ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.