वन्यजीवांच्या अधिवासाला अधिक संरक्षण उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यात नान्नज माळढोक अभयारण्याचाही धोकाग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. सोलापूरातील शेतकरी व गावकऱ्यांना त्यासंदर्भातील माहिती कळवण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यात वन्यजीव विभागातर्फे ग्रामसभा घेण्यात आल्या.
माळढोक अभयारण्याचा धोकाग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्रात समावेश
सहायक वनसंरक्षक दिलीप वाकचौरे (पुणे) यांनी गेल्या आठवड्यात नान्नज-गंगेवाडी माळढोक पक्षी अभयारण्य परिक्षेत्रातील गावांमध्ये ग्रामसभा घेतल्या. वन्यजीवांच्या अधिवासासाठी राज्यातील उपलब्ध अभयारण्ये धोकाग्रस्त अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात येत असून, त्यामध्ये नान्नज माळढोक पक्षी अभयारण्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापुढे माळढोक पक्षी अभयारण्य धोकाग्रस्त अतिसंवेदनशील वन्यजीव अधिवास म्हणून ओळखले जाणार आहे.
( हेही वाचा : कोकणवासीयांसाठी मोठी बातमी! परशुराम घाटात अवजड वाहनांची वाहतूक ‘या’ वेळेत राहणार बंद )
माळढोक अभयारण्यात शेतजमीन, घर असल्यास ते कायम ठेवण्यासाठी वैयक्तिक किंवा सामूहिक दावा शासन, जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांकडे प्रलंबित असल्यास मार्गी लावण्यात येतील. परंतु, हे क्षेत्र अतिसंवेदनशील वन्यजीव अधिवास म्हणून घोषित झाल्यानंतर दावा दाखल करता येणार नाही.
Join Our WhatsApp Community