धूम्रपान करू नका सांगितल्यावर माथेफिरूने थेट विमानाचा दरवाजा उघडण्याचा केला प्रयत्न! पुढे घडले असे…

179

लंडन ते मुंबई या एअर इंडियाच्या विमान प्रवासादरम्यान धक्कादायक घटना घडली असून एका अमेरिकन नागरिकाने या विमानात धूम्रपान करण्याचा आणि त्यानंतर विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आहे. या संबंधित व्यक्तीवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( हेही वाचा : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी दोघांना अटक)

नेमके प्रकरण काय? 

एका ३७ वर्षीय भारतीय अमेरिकन नागरिकाविरोधात मुंबईतील सहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानात धूम्रपान करण्यास मनाई आहे असे असतानाही या व्यक्तीने वॉशरुममध्ये धूम्रपान करण्याचा प्रयत्न केला यानंतर सगळे अलार्म वाजले तेव्हा सगळे कर्मचारी वॉशरुमच्या दिशेने धावत गेले आणि त्या व्यक्तीच्या हातात सिगारेटचे पाकिट सापडले. आम्ही लगेच त्याच्या हातातून सिगारेट काढून घेतली. तेव्हा तो व्यक्ती क्रू मेंबर्सवर ओरडायला लागला. नंतर त्याला आम्ही सीटवर बसवले. काही वेळाने हा आरोपी रमाकांत फ्लाइटच्या दरवाजाजवळ गेला आणि त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या वागण्यामुळे इतर प्रवाशांच्या सुरक्षेला सुद्धा धोका निर्माण झाले अशी माहिती एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सनी दिली आहे. तसेच या व्यक्तीचे नंतर आम्ही हातपाय बांधले आणि त्याला जागेवर बसून नंतर पोलिसात दिले असेही क्रू मेंबर्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आरोपीने मद्यधुंद अवस्थेत हे कृत्य केले की, तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता हे शोधण्यासाठी आरोपीचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.