Mangesh Padgaonkar : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, हा प्रेमाचा संदेश देणारे मंगेश पाडगावकर

373

मंगेश पाडगावकर हे मराठी साहित्य विश्वातले एक प्रसिद्ध नाव आहे. मंगेश पाडगावकर (Mangesh Padgaonkar) यांचा जन्म १० मार्च १९२९ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. पाडगावकर यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमधून मराठी आणि संस्कृत विषयामध्ये एम.ए. ही पदवी मिळवली. त्यानंतर ते काही काळासाठी मुंबई येथील रुईया कॉलेजमध्ये मराठी भाषा हा विषय शिकवत होते.

(हेही वाचा – West Bengal : अखेर ममता बॅनर्जींनाही आठवला प्रभु श्रीराम; प्रथमच दिली रामनवमीची सुट्टी)

साठ वर्षांपेक्षा जास्त काळ लेखन कारकीर्द

मंगेश पाडगावकर यांनी आपली लेखन कारकीर्द साठ वर्षांपेक्षा जास्त काळ गाजवली. आपल्या कारकिर्दीत पाडगावकरांनी परदेशी भाषांतील पुस्तकांचे अनुवादही केले आहेत. थॉमस पेनचे राजनैतिक निबंध, बायबलचा अनुवाद आणि कथारूप महाभारताचा दोन खंडांमध्ये केलेला अनुवाद केला आहे. त्यांनी एकंदर केलेल्या अनुवादित साहित्यांमध्ये सतरा अनुवाद हे अमेरिकन साहित्यांचे आहेत. त्यांत ‘ज्युलियस सिझर’, ‘रोमिओ ज्युलिएट’ आणि ‘द टेम्पिस्ट’ नावांच्या शेक्सपिअरच्या तिन्ही नाटकांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त मंगेश पाडगावकर यांनी संत मीराबाई, संत कबीर आणि सूरदास यांच्या अनेक पदांचेही अनुवाद केलेले आहेत. तसेच गुजराती कवितांचे अनुवाद असलेले ‘अनुभूती’ आणि ‘शिक्षण: जीवनदर्शन’ हे मंगेश पाडगावकर यांचे अनुवादित साहित्य आहे.

मिळालेले विविध पुरस्कार 

मंगेश पाडगावकर यांना मराठी साहित्यातील त्यांनी दिलेल्या योगदानासाठी अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांपैकी त्यांना ‘सलाम’ या काव्यसंग्रहासाठी १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर २००८ साली त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. तसेच २०१३ साली मंगेश पाडगावकर यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ आणि ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते.

एवढेच नाही तर मुंबईत जी-विभाग या ठिकाणी असलेला जुना प्रभादेवी रोड आणि स्वातंत्र्यवीर सावरकर रोड यांना जोडणाऱ्या नाक्यावरच्या चौकाला ‘मंगेश पाडगावकर चौक’ असं नाव देण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त दरवर्षी मंगेश पाडगावकर यांच्या नावाने ‘भाषा संवर्धक पुरस्कार देण्यात येतो. (Mangesh Padgaonkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.