ठाण्यातील खारफुटींवर बांधली घरे, वनविभागाची कारवाई

156

ठाण्यातील कोपरी परिसरातील खारफुटी तोडून चक्क तीन-चार बांधलेली बैठी घरे वनविभागाच्या कांदळवन कक्षाने शुक्रवार ८ एप्रिलपासून तोडायला सुरूवात केली आहे. ही कारवाई दिवसभर सुरु होती. याप्रकरणी दोषींना अटक केल्याचीही माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : लोडशेडींग टळणार! मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय )

वनाधिका-यांनी दिली माहिती 

शुक्रवार ८ एप्रिलपासून सकाळी दहा वाजल्यापासून वनविभागाच्या कर्मचा-यांनी ही बैठी घरे तोडायला घेतली. साधारणतः तीन महिन्यांपूर्वी कोपरी परिसरातील खारफुटींवर अनधिकृतरित्या बैठी घरे बांधल्याचे वनविभागाच्या कांदळवन कक्षाच्या निदर्शनास आल्याची माहिती कांदळवन कक्षाच्या वनाधिका-यांनी दिली. हे बांधकाम तातडीने थांबवण्यात आले. परराज्यातून आलेल्या मजूरांच्या साहाय्याने या भागांत घरांची बांधणी सुरु होती. या मजुरांना वनविभागाने अटक केली. त्यावेळी मजूरांनी बांधकामाचे काम देणा-या आरोपीचेही नाव सांगितले. सध्या हे सर्व आरोपी अटकेत असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. बैठी घरे तोडण्याची कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती. उद्या शनिवारीही ही कारवाई सुरु राहील, अशी माहिती वनाधिका-यांनी दिली.

New Project 3 7

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.