आता डॉल्फिन पाठोपाठ फिनलेस पोरपॉईजचाही उलगडा होणार

मुंबई किनारपट्टीतील समुद्री सस्तन प्राण्यांच्या अधिवासाचा लवकरच उलगडा होणार आहे. इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन आणि फिनलेस पोरपॉइस या दोन प्रजातींची पुढील दीड वर्षात गणना होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशाच्या किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अधिवास, त्यांचा विस्तार आणि गणना यांचा पुढील दीड महिन्यांत अभ्यास केला जाणार असल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. कोस्टल रोडच्या समुद्राकडील भागातील निवडकस्थळी प्रवाळ भिंतही उभारली जाणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सहयाद्री अतिथीगृह येथे कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक झाली. त्यात समुद्री सस्तन प्राण्यांच्या अभ्यासाला वनमंत्र्यांनी मान्यता दिली. बॅक बे, हाजी अली आणि माहीम खाडी तसेच मिठी, दहिसर, पोईसर, ओशिवरा आणि वैतरणा या पाच नदीच्या मुखांमध्ये राहणाऱ्या डॉल्फिन आणि फिनलेस पोरपॉइस या दोन प्रजातींची पुढील दीड महिन्यातं गणना होईल.
मुंबई किनारपट्टीच्या १० किमीच्या पट्ट्यातील ७० किमी (उत्तर – दक्षिण) किनारपट्टीच्या मर्यादेत समुद्री सस्तन प्राण्यांचा अभ्यास केला जाईल. समुद्री सस्तन प्राण्यांच्या प्रजातीला मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणारे धोके ओळखणे हा यामागील उद्देश आहे. या प्रकल्पाची अंदाजित रक्कम ३३.१६ लाख रुपये आहे.

( हेही वाचा: 253 राजकीय पक्षांना निष्क्रिय म्हणून घोषित )

बैठकीतील इतर महत्वाचे मुद्दे –
  • राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान (NIO) ला विविध प्रणाली वापरून प्रायोगिक तत्वावर कोस्टल रोड च्या समुद्राकडील भागातील निवडक स्थळी प्रवाळ भिंत उभारली जाईल. या प्रकल्पाचा कालावधी १ वर्ष असून त्याकरिता लागणारा निधी ८८ लाख रुपये आहे.
  • मारंबळपाडा येथील निसर्ग परिचय केंद्राला मान्यता

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here