वांद्रे येथील कार्टर रोड विभागातील खारफुटींची कत्तल करुन थेट डेब्रिज टाकले जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डेब्रिज टाकून चक्क २०० मीटरचा रस्ता उभारण्याचा प्रकार वनशक्ती या पर्यावरण प्रेमी संस्थेने समोर आणला.
( हेही वाचा : विद्याविहारजवळील रेल्वे पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा, १५ अनधिकृत झोपड्यांवर कारवाई)
२०० मीटरचा रस्ता उभारला
गेल्या वर्षभरापासून वांद्रे येथील खारफुटींवर डेब्रिजचा भराव टाकला जात आहे. ही जागा अद्याप वनविभागाच्या कांदळवन कक्षाला हस्तांतरित झालेली नसल्याचे माहिती मिळाली आहे. खारफुटींच्या खासगी जागेवरही कत्तल करणे कायद्याने गंभीर गुन्हा ठरते. वर्षभरात अगदी धीम्या गतीने खारफुटींच्या मधल्या भागांत हा रस्ता उभारला गेल्याची तक्रार वनशक्ती या पर्यावरणप्रेमी संस्थेचे संचालक आणि पर्यावरण संवर्धन समितीचे सदस्य स्टॅलिन दयानंद यांनी केली. आम्ही वर्षभरापूर्वीच याबाबत कांदळवन कक्ष, पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली. मात्र अद्याप अवैध खारफुटींच्या कत्तलींविरोधात कारवाई झालेली नाही, हा प्रकार मुंबईसारख्या शहरांत राजरोसपणे सुरु असल्याबाबत स्टॅलिन दयानंद यांनी संताप व्यक्त केला.
Join Our WhatsApp Communityआम्ही जागा हस्तांतरित करण्याच्या प्रयत्नात आहोत. जागा हस्तांतरित होण्याची प्रक्रिया सुरु आहे.
– वीरेंद्र तिवारी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष, वनविभाग