मणिपूरमधील तणावाची स्थिती काही सामान्य होण्याचे नाव घेत नाहीये. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा विविध भागात विद्रोही गट आणि सुरक्षा दलात चकमक झाल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, रविवारी पहाटे, दोन वाजता इम्फाल घाटीत आणि तिथल्या आजूबाजूच्या पाच भागांमध्ये एकत्र हल्ला झाला. यादरम्यान आता मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेश सिंह यांनी राज्यात ४० दहशतवादी ठार केल्याचा दावा केला आहे. शिवाय काही दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाने अटक केली आहे. ही कारवाई दहशतवादी गटांविरुद्ध प्रति आणि बचावात्मक कारवाईचा भाग म्हणून करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
(हेही वाचा – लग्न समारंभ आटोपून परतत असताना भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू)
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी नक्की काय सांगितले?
मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी सुरक्षा दल आणि मणिपूर पोलिसांच्या कारवाईबाबत बोलताना सांगितले की, ‘ज्या दहशतवादी समूहाविरोधात कारवाई केली गेली आहे, ते लोकं अत्याधुनिक शस्त्रांनी हल्ले नागरिकांवर करत होते. त्यामुळे दहशतवाद्यांविरोधात एम-16 आणि एके-47 असॉल्ट रायफल आणि स्नाईपर गनचा वापर करण्यात येत आहे. हे दहशतवादी गावातील काही घरे जाळण्यासाठी आले होते. त्यालाच प्रत्युत्तर देताना लष्कर आणि इतर सुरक्षा दलाने गोळीबार केला.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, दहशतवादी नि:शस्त्र नागरिकांवर हल्ले करून राज्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही चकमक फक्त दोन समुदायांमधील नसून कुकी अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community