स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सैनिकीकरणाचा पुरस्कार केला. त्यामुळे ब्रिटिश राजवटीत हिंदू सैनिकांची संख्या वाढली आणि मुस्लिमांची संख्या कमी झाली. धर्माच्या आधारावर जेव्हा फाळणी झाली तेव्हा मुस्लिम पलटणी तिकडे गेल्या. त्यांची संख्या जास्त असती, तर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला असता आणि भारतच ताब्यात घेतला असता. वीर सावरकर यांच्या सैनिकीकरणाच्या पुरस्कारामुळे आझाद हिंद सेनेलाही प्रशिक्षित सैनिक मिळाले आणि सैनिकीकरणाच्या पुरस्कारामुळेच आपल्या देशाचं अस्तित्व टिकून आहे, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी केले. (Veer Savarkar)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१व्या जयंतीनिमित्त वैष्णवी मंगल कार्यालयातील व्याख्यानात मंजिरी मराठे बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी सद्य परिस्थिती आणि वीर सावरकरांचे विचार मांडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अजित मधुकररावजी चौधरी, स्वातंत्र्यवीर साहित्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद धानोरकर होते. (Veer Savarkar)
(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘हिंदुत्व’ या विषयावरील कोट्स!)
आपण जागं होणं गरजेचं…
त्या पुढे म्हणाल्या की, स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षांनीसुद्धा वीर सावरकरांनी सांगितलेल्या हिंदू संघटन कार्याची तेवढीच आवश्यकता आहे. राजकारणासाठी आपल्याला जातीपातीत विभागलं जातच आहे. अनेक व्यवसाय आपले नाहीत. महामार्गांवरची हॉटेल्स आपली नाहीत, आपल्या देवळांबाहरेची दुकानंसुद्धा आपली नाहीत. फाळणीच्या वेळी देशाचे दोनच तुकडे झाले. आता असंख्य तुकडे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे थांबवायचं असेल, तर हिंदू संघटन आवश्यक आहे. हजार तुकड्यांमध्ये आपल्याला घायाळ करायचंय. जगाचच ज्यांना दारूल इस्लाम करायचं आहे आणि त्या दृष्टिने त्यांची पावलं पडत आहेत. हे समजून घेऊन आपण जागं होणं गरजेचं आहे. (Veer Savarkar)
देश वीर सावरकरांच्या विचारांवरच चालतो आहे
हिंदू संघटन हे हिंदूंच्या एकीसाठी आवश्यक होतं, तसं सगळ्या हिंदूंची एक संपर्क भाषा हवी. म्हणून त्यांनी हिंदीचाही पुरस्कार केला, तर आता महाराष्ट्रातही हिंदी भाषेला विरोध होतो. दक्षिणेत हिंदी बोलत नाहीत, पण इंग्रजी बोलतात. आपली संपर्काची एक भाषा म्हणून हिंदीचा वापर किंवा हिंदीला आपणच एक भाषा भगिनी म्हणून सन्मान देणं गरजेचं आहे. वीर सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या सर्वसमावेशक आहे. त्यांनी सांगितलेल्या व्याख्येनुसार, ‘वैदिक सनातनी, आर्य समाजी, लिंगायत, जैन, बौद्ध, शिख, निरीश्वरवादीसुद्धा हिंदू आहेत आणि हे समजून जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होत राहणार.’ त्यांचे विचार कालातीत आहेत आणि आजही ते आपल्याला अनुकरणीय आहेत. वीर सावरकरांनी स्वदेशीचा पुरस्कार सुरू केला. आता ‘मेक इन इंडिया’ सुरू झालं आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही सावरकरांची कल्पना होती. जी-२०चंही हेच घोषवाक्य होतं. त्यामुळे वीर सावरकरांचं प्रत्यक्ष नाव जरी घेतलं जात नसलं तरी देश त्यांच्या विचारांवरच देश चालतो आहे, असं त्या म्हणाल्या. (Veer Savarkar)
या कार्यक्रमाची सुरुवात वीर सावरकर आणि भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर विश्राम परळीकर यांच्या संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मयंक विश्राम परळीकर यांच्या नेतृत्वाखाली ‘अनादि मी अवध्य मी’ हे गीत गायलं. सुषमा बुद्रुककर यांनी प्रस्तावनेत स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाची सविस्तर माहिती दिली. वीणा मांडाखळीकर यांनी गोविंदस्वामी आफळे रचित ‘सागरपरि अति अथांग जीवन, कसे करू हो मी अवगाहन’ हे गीत सादर केले. डॉ. अजित चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. विशाखा अजित चौधरी यांनी कार्यक्रमाचे संचलन केले. सुचेता काशिकर यांनी वंदे मातरम म्हटले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंडू सराफ, अभिजित सराफ, मंडळाचे दोन्ही उपाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य व सावकरप्रेमींनी परिश्रम घेतले. (Veer Savarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community