Veer Savarkar : वीर सावरकरांच्या कार्याचा प्रचार-प्रसार करणाऱ्या Manjiri Marathe यांचा ‘समाजभूषण पुरस्कारा’ने गौरव

पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात आयोजित ब्राह्मण सामर्थ्य संमेलनात देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी पोलीस अधिकारी राजू कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

39

वीर सावरकरांच्या (Veer Savarkar) कार्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या आणि हिंदु धर्म तत्त्वानुसार काम करणाऱ्या आस्थापनांना ओम प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रोत्साहन देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे (Manjiri Marathe) यांचा नुकताच ‘समाजभूषण पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात आयोजित ब्राह्मण सामर्थ्य संमेलनात देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी पोलीस अधिकारी राजू कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, भावेनजी पाठक, कुणाल टिळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या संमेलनात समाजासाठी विशेष योगदान देणारे कुंदन कुमारसाठे, संस्थापक-अध्यक्ष थोरले बाजीराव पेशवे संस्था; सुरेश साखळकर, संस्थापक-अध्यक्ष, बहुभाषिक ब्राह्मण संघ; संदीप डोळे, मनोहर डोळे फाउंडेशन; अ‍ॅड. सन्मान आयाचित; अ‍ॅड. संग्राम कोल्हटकर, किरणजी जोशी, उज्ज्वला गौड, वेदमूर्ती केशव दिवाकर दिगवेकर यांना सन्मानित करण्यात आले. महेश दादा लांडगे यांच्या वतीने कार्तिक लांडगे यांनी ‘ब्रह्म मित्र विशेष पुरस्कार’ या प्रसंगी स्वीकारला. या वेळी विशेष वक्ते सात्यकी सावरकर यांनी ‘हिंदुत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले.

हिंदू म्हणून काम करत रहावे – राहुल सोलापूरकर

सुसंस्कृत, सुसंस्कारित समाज आणि राष्ट्रहितासाठी सर्वांना उभे करणे हे आपले कर्तव्य आहे. ब्राह्मण ही माझ्यासाठी जात नसून एक आदर्श वृत्ती, संस्कृती आहे. आपण हिंदू म्हणून काम करत रहावे. कृत, कारिता आणि अनुदित या महत्त्वाच्या तत्त्वांवर ब्राह्मण समाज काम करत आहे. समाजातील सर्व क्षेत्रांत ब्राह्मण समाज कार्यरत आहे. दुर्दैवाने गांधी हत्येनंतर जे काही अत्याचार सहन करावे लागले, त्यामुळे ब्राह्मण समाज अत्यंत कोशात गेला. मूळ कर्तव्य विसरला. आजची पिढी तर आपण शिकूया व परदेशात जाऊया या मानसिकतेत असल्याचे दिसून येते, असे आवाहन जेष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांनी या वेळी बोलतांना केले.

(हेही वाचा Veer Savarkar यांचा अवमान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात नाशिक न्यायालयाने बजावले समन्स)

सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे हिंदूंचे बंधुत्व आहे – सात्यकी सावरकर

संमेलनात सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) यांनी ‘हिंदुत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. सात्यकी सावरकर म्हणाले, गेल्या काही वर्षातील किंवा शतकातील हिंदूविरोधी घटना बघता आता हिंदूंनी जातीभेद मोडून एकत्र येणे आवश्यक आहे. ‘बटेंगे तो कंटेंगे’ हे योगी आदित्यनाथ यांचे विधान लक्षात घ्यावे. सावरकरांचे (Veer Savarkar) हिंदुत्व म्हणजे हिंदूंचे बंधुत्व आहे. समान रक्त, समान इतिहास आणि समान संस्कृती यांनी युक्त असे भावकीचे नाते आहे. सावरकरांनी जसे हिंदूंचे प्रबोधन केले, तसे मुस्लिमांचे देखील केले. त्यामुळे सावरकर हे मुस्लिम विरोधी नव्हते.” असे सांगून सावरकर यांनी येत्या निवडणुकीत सर्वांनी शत प्रतिशत मतदान करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.

हिंदु धर्म तत्त्वानुसार काम करणाऱ्यांना ओम प्रतिष्ठानचे प्रोत्साहन

ओम प्रतिष्ठान ही हिंदू ते हिंदू या संकल्पनेवर आधारित सर्व हिंदूंच्या कल्याणासाठी स्थापन केलेली संस्था आहे. देशभरातील कोट्यवधी हिंदू देवी-देवतांच्या दर्शनासाठी मोठ्या भक्तिभावाने जातात. देवतांना फुले, नारळ आणि प्रसाद अर्पण केला जातो. तो शुद्ध असला पाहिजे, ही त्यांची भावना आहे. मात्र तो प्रसाद गायीच्या चरबीचा असेल आणि त्यावर थुंकलेले असेल, तर हा भाविकांचा मोठा विश्वासघात आहे, हे लक्षात घेऊन भक्तांना शुद्ध प्रसाद आणि पूजासाहित्य मिळावे, या विचाराने ओम प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ओम शुद्धता प्रमाणपत्रे मंदिराबाहेरील दुकाने, प्रसादालये आणि भोजनालयांमध्ये वितरित केली जात आहेत. त्र्यंबकेश्वर, नाशिकनंतर महाराष्ट्र आणि त्यानंतर देशभरातील विविध मंदिरांमध्ये या प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येत आहे. त्यासोबतच हिंदु धर्म तत्त्वानुसार काम करणाऱ्या आस्थापनांना ओम प्रतिष्ठानच्या माध्यमातून ओम प्रमाणपत्र दिले जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.