Manju Bansal यांचा जन्म १ डिसेंबर १९५० रोजी झाला. हैदराबाद आणि डेहराडून येथून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांना विज्ञानाची खूप आवड होती. पुढे त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून बीएससी आणि एमएससी प्राप्त केली. १९७२ मध्ये त्यांनी मॉलिक्युलर बायोफिजिक्स युनिट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (Indian Institute of Science), बंगलोर येथून डॉक्टरेट पदवी मिळवली.
(हेही वाचा – India Alliance PM Candidate : राहुल गांधी नाहीत.. ‘हा’ असू शकतो पंतप्रधानपदाचा चेहरा ?; सोनिया गांधी यांचे संकेत)
Manju Bansal यांना मॉलिक्युलर बायोफिजिक्स (Molecular Biophysics) या क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. सध्या त्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरूमध्ये मॉलिक्युलर बायोफिजिक्स युनिटसाठी सैद्धांतिक बायोफिजिक्स गटाच्या (Theoretical Biophysics Group) प्राध्यापक आहेत. त्या बंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फॉरमॅटिक्स आणि अप्लाइड बायोटेक्नॉलॉजीच्या संस्थापक संचालक आहेत.
अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट फेलो
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना बायोफिजिसिस्ट जी. एन. रामचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना फायब्रॉस प्रोटीन कोलाजेनच्या ट्रिपल हेलिकल स्ट्रक्चरवर (Triple helical structure) काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्या वर्षभरासाठी हेडलबर्ग येथील युरोपियन मॉलिक्युलर बायोलॉजी लॅबोरेटरी येथे अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट फेलो म्हणून जर्मनीला गेल्या आणि त्यांनी फिलामेंटस फेजच्या स्ट्रक्चरवर काम केले.
रटगर्स युनिव्हर्सिटी, यूएसए येथे व्हिजिटिंग प्रोफेसर
Manju Bansal यांना ईएमबीएल व्हिजिटिंग फेलोशिप आणि एव्हीएच फेलोशिप, जर्मनी आणि सीनियर फुलब्राइट फेलोशिप, यूएसए (Rutgers University, USA) प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी रटगर्स युनिव्हर्सिटी, यूएसए येथे व्हिजिटिंग प्रोफेसर आणि एनआयएच, बेथेस्डा, यूएसए येथे व्हिजिटिंग कन्सल्टंट म्हणून काम केले आहे. बन्सल यांना १९७९ मध्ये तरुण शास्त्रज्ञ म्हणून INSA पदक प्रदान करण्यात आले. त्या १९९८ पासून इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस, बंगलोर आणि नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेस (इंडिया), प्रयागराजच्या फेलो आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community