दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित होणाऱ्या मन की बात (Mann Ki Baat 100) कार्यक्रमाचा आजचा शंभरावा भाग होत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले.
शंभराव्या मन की बातमध्ये (Mann Ki Baat 100) बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “शंभराव्या पर्वाबाबत हजारो पत्र आणि मेसेज आले आहेत. ही पत्रं वाचून माझं मन भावूक झालं. मन की बातचे शंभर भाग पूर्ण केल्याबाबत अनेकांनी माझं अभिनंदन केलं, पण खरे अभिनंदनाचे पात्र श्रोते आहेत. मन की बातच्या माध्यमातून अनेक जनआंदोलन सुरू झाली. ‘मन की बात’शी संबंधित विषय जनआंदोलन बनला. खेळणी उद्योगाची पुनर्स्थापना करण्याचं मिशन मन की बात या माध्यमातूनच सुरू झालं. आपले भारतीय श्वान म्हणजेच, देशी श्वानांबाबत जागरुकता निर्माण करण्याची सुरुवातही मन की बातने झाली. अशाप्रकारे प्रत्येक समाजात परिवर्तनाचं कारण मन की बात बनली.
(हेही वाचा – Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ चा (Mann Ki Baat 100) रविवार ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता १०० वा भाग प्रसारित झाला. या ऐतिहासिक क्षणासाठी भाजपकडून देशभरात जय्यत तयारी करण्यात आली. या कार्यक्रमाचे न्यूयॉर्कस्थित संयुक्त राष्ट्र मुख्यालयासह देश-विदेशात ४ लाख ठिकाणी प्रसारण झाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित विले-पार्ले येथे बसून या कार्यक्रमाचा (Mann Ki Baat 100) आस्वाद घेतला. तर दुसरीकडे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई सेंट्रल येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
हेही पहा –
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई सेंट्रल येथील १०० कुली बांधवांना एकत्रित ”मन की बात” (Mann Ki Baat 100) हा कार्यक्रम ऐकता यावा याची सोय केली होती.
Join Our WhatsApp Community