मन्नथु पद्मनाभन पिल्लई (Mannathu Padmanabhan Pillai) यांचा जन्म २ जानेवारी १८७८ रोजी भारतातील कोट्टायम जिल्ह्यातील चांगनाचेरी येथील पेरुन्ना गावात झाला. १८९३ मध्ये त्यांनी सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. १९०५ पासून त्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात कायद्याचा सराव सुरू केला. पिल्लई हे केरळमधील मोठे समाजसुधारक मानले जातात.
नायर सर्व्हिस सोसायटीची स्थापना
३१ ऑक्टोबर १९१४ रोजी त्यांनी नायर सर्व्हिस सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीचे उद्दिष्ट नायर समाजाला सामाजिक न्याय मिळवून देणे. १९१५ पासून त्यांनी कायद्याची प्रॅक्टिस सोडली आणि नायर सर्व्हिस संस्थेचे सचिव म्हणून काम करु लागले. १९२४-२५ मध्ये नायर सर्व्हिस सोसायटीने त्रावणकोर सरकारला नायर नियमन लागू करण्यास प्रवृत्त केले, ज्यामुळे पितृ आणि मातृ संपत्ती सर्व मुलांमध्ये विभागली गेली.
कौटुंबिक मंदिर दलितांसाठी खुले केले
पिल्लई (Mannathu Padmanabhan Pillai) यांनी सामाजिक समतेसाठी मोठा लढा दिला होता. वायकोम येथील मंदिराजवळील सार्वजनिक रस्ते दलित हिंदूंसाठी खुले करावेत अशी मागणी करणारा वायकोम सत्याग्रम केला. त्यांनी वायकोम आणि गुरुवायूर मंदिर-प्रवेश आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. अनेक अस्पृश्यता विरोधी आंदोलने केली. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःचे कौटुंबिक मंदिर सर्व दलितांसाठी खुले केले.
राजकारणात प्रवेश
१९४६ मध्ये ते कॉंग्रेसचे सदस्य झाले. त्रावणकोरमधील सर सी.पी. रामास्वामी अय्यर यांच्या कारभाराविरुद्ध मोठे आंदोलन केले. त्रावणकोरमध्ये अनेक मंदिरे बंद पडली होती. त्या मंदिरांचे पुनर्निमानाचे काम त्यांनी केले. १४ जून १९४७ रोजी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.
(हेही वाचा NIA कडून दहशतवाद्यांचा अधिकृतपणे ‘जिहादी’ असा उल्लेख; २०२३ मध्ये ६२५ जणांवर कारवाई)
१९४९ मध्ये पिल्लई (Mannathu Padmanabhan Pillai) त्रावणकोर विधानसभेचे सदस्य झाले. १९५९ मध्ये त्यांनी चर्च आणि राज्यातील कम्युनिस्ट मंत्रालयाच्या विरोधात लढा दिला, ज्यास विमोचना समरम (मुक्ती संघर्ष) म्हटले. मंत्री के.आर. गोवारी यांनी जमीन सुधारणा विधेयक मांडले आणि या चळवळीमुळे ३१ जुलै १९५९ रोजी कम्युनिस्ट सरकार बरखास्त झाले. राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू झाली. १९६४ मध्ये त्यांनी केरळ काँग्रेस हा भारतातील पहिला प्रादेशिक पक्ष स्थापन केला.
पद्मनाभन हे नायर सर्व्हिस सोसायटीचे ३१ वर्षे सचिव आणि तीन वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना भारत केसरी या पदवीने गौरविण्यात आले. १९६६ मध्ये त्यांना पद्मभूषणही मिळाले होते. वयचया ९२ व्या वर्षी २५ फेब्रुवारी १९७० मध्ये त्यांचे निधन झाले.
Join Our WhatsApp Community