केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी, सुप्रसिद्ध गायक दिवंगत पंकज उदास आई कलाकार शेखर कपूर यांना पद्म भूषण (Padma Bhushan) तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, चित्रकार अच्युत पालव, वासुदेव कामत, लेखक मारूती चितमपल्ली यांच्यासह राज्यातील ११ जणांना पद्मश्री (Padma Shri) पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यंदा ७ पद्म विभूषण जाहीर करण्यात आले, त्यामध्ये महाराष्ट्रातील एकही नाव नाही, मात्र १९ पद्म भूषण पुरस्कारांमध्ये २ जण महाराष्ट्रातील असून ११३ पद्मश्री पैकी ११ जण महाराष्ट्रातील आहेत.
केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षी पद्म पुरस्काराची घोषणा केली जाते. विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणा—या नागरिकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. हा पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण (Padma Bhushan) आणि पद्मश्री (Padma Shri) अशा तीन श्रेणींमध्ये दिले जातात. केंद्र सरकारने आज कला, सामाजिक कार्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, मेडिकल, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रातील ११३ जणांच्या नावांची घोषणा पद्मश्री विजेते म्हणून केली आहे.
(हेही वाचा Republic Day : महाराष्ट्रातील 48 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर)
पद्म भूषण (Padma Bhushan) पुरस्कार विजेते
- माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर)
- सुप्रसिद्ध गायक पंकज उदास (मरणोत्तर)
- कलाकार शेखर कपूर
(हेही वाचा Republic Day : महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर)
पद्मश्री (Padma Shri) पुरस्कार विजेते
- अशोक सराफ (कला)
- अश्विनी भिडे-देशपांडे (कला)
- अच्युत पालव (कला)
- जैसपिंदर नेरुला (कला)
- रानेंद्र मजुमदार (कला)
- वासुदेव कामत (कला)
- मारूती चितमपल्ली (साहित्य)
- सुभाष शर्मा (शेती)
- चैतराम पवार (समाजसेवा)
- अरुंधती भट्टाचार्य (उद्योग आणि व्यापार)
- विलास डांगरे (औषध)
संपूर्ण यादी वाचा
Join Our WhatsApp Community