हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू कलाकार आणि ‘भारतकुमार’ अशी ओळख लाभलेले ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या निधनाने (Manoj Kumar Passes Away) भारतीय चित्रपटविश्वातील एक उज्ज्वल युग संपुष्टात आले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी तीव्र शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
(हेही वाचा – Delhi-NCR मध्ये एका वर्षासाठी फटाके वाजवण्यास बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय)
मनोज कुमार म्हणजे समाजप्रबोधन आणि राष्ट्रीयतेचा झरा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, “चित्रपट माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर ठसवणाऱ्या या अष्टपैलू कलाकाराने ‘भारतकुमार’ हे बिरूद सार्थकी लावले. त्यांच्यामुळे देशप्रेमाची भावना सामान्य नागरिकांच्या मनात अधिक खोलवर रुजली. ‘शहीद’ चित्रपटात भगतसिंग यांच्या भूमिकेद्वारे त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची ठसठशीत छाप उमटवली. शेती आणि ग्रामीण भारतावर भाष्य करणारा ‘उपकार’ चित्रपट, त्यातील ‘मेरे देश की धरती’ हे गीत आजही स्वातंत्र्यदिनी अभिमानाने गुणगुणले जाते. ‘पूरब और पश्चिम’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी समाजप्रबोधन आणि राष्ट्रीयतेचा झरा कायम ठेवला.”, असे ही फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “मनोज कुमार हे केवळ अभिनेता नव्हते, तर एक उत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथालेखक, गीतकार, संकलक होते. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या समृद्धीमध्ये मोलाची भर घातली. त्यांच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ आणि ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित केले. त्यांच्या निधनाने फक्त हिंदी सिनेसृष्टी नव्हे तर संपूर्ण देशाने एक श्रेष्ठ राष्ट्रप्रेमी कलाकार गमावला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि कोट्यवधी चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
(हेही वाचा – Clean Up Marshals चे दुकान शुक्रवारपासून कायमचेच होणार बंद; दिसले तर कळवा महापालिकेच्या ‘या’ क्रमांकावर)
भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अंत : उपमुख्यमंत्री अजित पवार
दरम्यान ‘भारतकुमार’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि देशभक्तीपर चित्रपटांचे शिल्पकार मनोज कुमार यांच्या निधनाने (Manoj Kumar Passes Away) भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, “हिंदी चित्रपटसृष्टीतील दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व असलेल्या मनोज कुमार यांनी आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय समाजाच्या मनात देशप्रेमाची भावना जागवली. ‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ यांसारख्या कालातीत चित्रपटांनी त्यांनी केवळ मनोरंजनच केले नाही, तर समाजातील वास्तव आणि राष्ट्रनिष्ठा प्रभावीपणे मांडली. त्यांच्या अभिनयात आणि दिग्दर्शनात असलेली राष्ट्रभक्ती आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार, ‘पद्मश्री’ यांसारख्या प्रतिष्ठित सन्मानांनी गौरवले गेलेले मनोज कुमार हे अनेक नवोदित कलाकारांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या कार्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवा अर्थ लाभला. त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती आणि सद्गती लाभो, अशी प्रार्थना मी करतो,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community