कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासून सर्वसामान्यांना मंत्रालयातील प्रवेश बंद करण्यात आला होता. परंतु आता जवळपास दोन वर्षांनंतर सर्वसामान्यांना मंत्रालयाची दारे खुली होणार आहेत. येत्या १८ मे पासून मंत्रालयात जाण्यासाठी पुन्हा एकदा सामान्यांना प्रवेश पत्रिका देण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : गुगलमध्ये ‘हे’ सर्च कराल तर थेट जेलमध्ये जाल )
प्रवेश पत्रिका पद्धती पुन्हा सुरू करण्याची मागणी
कोरोनाचा विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १६ मार्च २०२० रोजी आदेश काढून सर्वसामान्य नागरिकांच्या मंत्रालय प्रवेशावर निर्बंध लागू केले होते. तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरही मर्यादा घातल्या होत्या. परंतु आता राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला असून विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने मंत्रालयात सर्वसामान्य जनतेला प्रवेश देण्याची प्रवेश पत्रिका पद्धती पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
यानुसार आता तब्बल २ वर्षांनंतर १८ मे पासून सर्वसामान्य नागरिकांना मंत्रालयात प्रवेशपत्रिका देण्याची व्यवस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.