मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने भायखळा येथील जेजे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. जेजे रुग्णालयाने त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगत अधिक माहिती देण्यास नकार दिला.
तपशील देण्यास जेजे रुग्णालयाचा नकार
पैसे उकळण्याच्या आरोपावरुन सध्या रमेश केरे पाटील चर्चेत होते. या आरोपामुळे मानसिक ताणावातून त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने नाशिकहून जेजे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. पाटील यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून आपण आत्महत्या करत असल्याचे जाहीर केले. लाईव्हवरच त्यांनी विष प्राशन केल्याने हा व्हिडिओही बराच व्हायरल झाला आहे. केरे यांना जेजे रुग्णालयात भरती केल्याबाबत रुग्णालय प्रशासनाने रविवारी दुपारी उशिराने कबुली दिली. मात्र तपशील देण्यास जेजे रुग्णालय प्रशासनाने नकार दिला आहे.
( हेही वाचा: परतीच्या पावसाचा मुक्काम अजून चार दिवसांनी वाढला… )
Join Our WhatsApp Community