सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

83

अभिनेता आणि शिवसेना चित्रपट सेनेचा कार्याध्यक्ष सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक आणि गाडीची तोडफोड करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत सुशांतच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी सुशांत ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती सुशांत शेलारने दिली आहे.

नेमके सीसीटीव्हीत काय आहे

सुशांत शेलारच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. यात 15 मे रविवारी मध्यरात्री 2 च्या आसपास सुशांतच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केल्याचे, पाहायला मिळत आहे. दगडफेक करण्यात आली त्यावेळी त्याची गाडी पार्किंगमध्ये उभी होती. या प्रकरणी आता पोलीस तपासात काय समोर येते हे पाहावे लागणार आहे.

( हेही वाचा :…आणि मुरारबाजी देशपांडेंचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.