ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे शनिवारी 18 मार्चला सकाळी कोल्हापुरात निधन झाले. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील निवासस्थानापासून सकाळी साडेअकरा वाजता अंत्ययात्रेस सुरुवात होणार आहे.
300 हून अधिक चित्रपटांत अभिनय
भालचंद्र कुलकर्णी यांचे मराठी सिनेमातील योगदान मोठे आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसले, जावयाची जात, अशा 300 हून अधिक चित्रपटांत त्यांनी काम केले होते. 1984 साली आलेल्या ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटातील चांगभलं रं चांगभंल, देवा ज्योतिबा चांगभलं हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे खूपच लोकप्रिय झाले होते. चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक, चित्रपट विषयक तसेच आंदोलनात्मक कामातही ते सक्रिय होते. भालचंद्र कुलकर्णी यांनी काही काळ शिक्षक म्हणूनही काम केले होते.
( हेही वाचा: दारूच्या प्रत्येक बाटलीवर १० रुपये गोमाता अधिभार! देशातील ‘या’ राज्याचा मोठा निर्णय )
Join Our WhatsApp Community