भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त केला गेला. याशिवाय बॉलिवूड आणि मराठी सिने क्षेत्रातील कलाकारांनीही लतादीदींच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. लता मंगेशकर यांच्या पार्थिव देहावर शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. लतादीदींच्या अत्यंसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राजकारणातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. इतकेच नाही तर बॉलिवूडमधील काही कलाकारांनीही लता दीदींचे दर्शन घेतले. परंतु शिवाजी पार्कात झालेल्या अत्यंसस्काराच्या वेळी एकही मराठी कलाकार उपस्थित नसल्याने सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अभिनेत्री हेमांगीने दिले सडेतोड उत्तर
यासह मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी नेमकी याच दिवशी कुठे होती, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. यावर आता अभिनेत्री हेमांगी कवी हिने सडेतोड उत्तर दिले आहे. इतकेच नाही तर तिने सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न देखील केल्याचे समोर येत आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. लता मंगेशकर गेली अनेक दिवस कोरोना आणि न्यूमोनियामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होत्या मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
(हेही वाचा – स्मारकाचा वाद तापणार? राऊत म्हणताय लता दीदींचं स्मारक होईल पण…)
का नव्हते मराठी कलाकार…
“सरकारी प्रोटोकॉल्स आड आले. मला गेटमधून आत जाऊ दिलं नाही. खूप विनंती केली. मला या गेटवरून त्या गेटवर जा म्हणत राहिले. शेवटी एका पीएसआय साहेबांना माझी दया आली आणि मला लपून लपून कसा बसा प्रवेश मिळवून दिला. नंदेश उमप, मी आणि अभिजीत केळकर ४ वाजल्यापासून तिथं होतो. शेवट पर्यंत आम्हांला विनंती करून ही दर्शन मिळत नव्हतं. संगीताचे खरे वारसदार गायक शान, शैलेंद्र सिंग, बेला शेंडे, कविता पौडवाल यांना ही मागे हटकलं जात होतं, तिथं माझी काय गत!”
यापुढे ती असेही म्हणाली आम्ही तिथे कुणी सेलिब्रीटी म्हणून गेलेलो नव्हतो. एक निस्सीम रसिक म्हणूनच गेलो होतो. आम्हाला ही शासकीय प्रोटोकॉल्स कळत होते, म्हणून थांबून होतो. पण नंतर आम्हाला सांगितलं वेळ नाहीये आता जवळून दर्शन मिळणार नाही. अक्षरशः भांडून आम्ही शेवटचं दर्शन घेतलं! कदाचित याची कल्पना काही लोकांना असावी म्हणून कुणी आलं नसावं.”
Join Our WhatsApp Community