दोन वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ प्रकरणातही केतकीच्या अडचणी वाढणार?

147

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे सध्या चर्चेत आहे. त्याचवेळी दोन वर्षांपूर्वीच्या एका जून्या प्रकरणाचीही आता चर्चा होऊ लागली आहे. २०२० मध्ये ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयाने केतकीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तरीही तेव्हा तिला अटक झाली नव्हती. मात्र आता केतकीवर कारवाई झाल्याने या जून्या प्रकरणातही तिच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(हेही वाचा – आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकीनेच न्यायालयालाच केला सवाल, म्हणाली…)

काय आहे प्रकरण?

रबाळे पोलीस ठाण्यात केतकी चितळेवर २०२० मध्ये ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी तिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळूनदेखील नवी मुंबई पोलिसांनी तिला अटक केली नव्हती. पोलिसांनी कारवाई करण्यात चालढकल केल्याचा आरोप तक्रारदार स्वप्नील जगताप यांनी केला आहे.

शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. याच प्रकरणात तिच्यावर इतरही दोन ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पवार यांच्यावर टीका होताच तिला अटक केली. मात्र, अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तिच्या अटकेबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही, अशी खंत तक्रारदार ॲड. स्वप्नील जगताप यांनी व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – केतकीला झालेला ‘एपिलेप्सी’ आजार नेमका आहे तरी काय?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.