उबेरमधून प्रवास करताना अभिनेत्रीला आला धक्कादायक अनुभव! आरडाओरड केल्यानंतर झाली सुटका

158

मराठी अभिनेत्री मनवा नाईकला उबेरने प्रवास करताना धक्कादायक अनुभव आला आहे. याबाबत फेसबुकवर पोस्ट करत तिने माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये मनवाने गाडीचा क्रमांक आणि वाहनचालकाचा फोटोही दिला आहे.

( हेही वाचा : राज ठाकरेंनी अंधेरी निवडणूक लढू नका सांगितल्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…)

प्रवासादरम्यान वाईट अनुभव 

उबेरने प्रवास करताना मनवा नाईकला धक्कादायक अनुभव आला तिने रात्री ८.१५ ला उबेर बुक केली त्यानंतर ड्रायव्हर सतत फोनवर बोलत असल्याने तिने ड्रायव्हरला फोनवर न बोलण्याचा सल्ला दिला. वारंवार सांगून ड्रायव्हर मनमानी करत असल्याचे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे. या उबेर ड्रायव्हरची पोलिसांसोबत सुद्धा हुज्जत झाली. नियम मोडले म्हणून पोलिसांनी गाडीचा फोटो काढला, त्यावर तू ५०० रुपये दंड भरणार आहेस का असे प्रश्न त्याने अभिनेत्रीला विचारला. तू फोनवर बोलत होतास म्हणून थांबवले असे सांगितल्यावर हा संबंधित ड्रायव्हर अभिनेत्रीला थांब तुला बघतो धमकी देऊ लागला.

आरडाओरड केल्यानंतर सुटका

मनवा नाईकने पुढे सांगतिले, उबेर चालकाला मी गाडी पोलीस स्टेशनजवळ घ्यायला लावली तर त्याने बीकेसीमधील जिओ गार्डन परिसरात गाडी थांबवली. मी ड्रायव्हरला पोलीस स्टेशनला चल सांगितले तर त्याने भांडण करण्यास सुरूवात केलीय उबेर सेफ्टीला फोन केल्यावर सुद्धा हा ड्रायव्हर गाडी वेगाने चालवत होतो. त्यानंतर प्रियदर्शनी पार्कमध्ये पोहोचल्यावर मी जोरजोरात हाका मारत आरडाओरड करायला सुरूवात केली. त्यावेळी दोन दुचाकीस्वार आणि एका रिक्षाचालकाच्या मदतीने माझी त्या उबेरमधून सुटका झाली आता मी सुरक्षित आहे. परंतु या प्रसंगामुळे चांगलीच घाबरले अशी पोस्ट मनवाने फेसबुकवर लिहित आपला अनुभव शेअर केला आहे.

नेटकऱ्यांनी मनवाला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत असून तिने मुंबई पोलिसांनाही यात टॅग केले आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी देथील मनवाच्या पोस्टवर कमेंट करत घटनेची दखल घेतल्याचे नमूद केले आहे. या चालकाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.