मराठी चित्रपसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे आज राहत्या घरी ह्दयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. त्या ६१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे.
प्रेक्षकांच्या मनात घर
८० च्या दशकात प्रेमा किरण यांचे अनेक चित्रपट गाजले. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्यासोबतच्या त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. अर्धांगी, धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी आपली नवीन ओळख निर्माण केली . मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. त्याच्या बोलण्याच्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. ”धुम धडाका” चित्रपटातील त्यांनी साकारलेली ”अंबाक्का” प्रचंड गाजली होती.
( हेही वाचा: औरंगाबाद सभा : राज ठाकरेंचा ‘वसंता’ पुन्हा चर्चेत )
अनेक भूमिका साकारल्या
फक्त मराठीच नाही तर गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा या भाषेतील चित्रपटांमध्येही त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. प्रेमा किरण या निर्मात्यादेखील होत्या. १९८९ मध्ये आलेल्या ”उतावळा नवरा” या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती.
Join Our WhatsApp Community